सांगली : राजेश पाटील

'मला मिळालेला राज्यस्तरीय  'महिला समाजभूषण पुरस्कार हा तमाम स्त्री शक्तीचा आहे '!असे गौरवोद्गार कवठेमहांकाळ (जि. सांगली) च्या पहिल्या महिला नगराध्यक्ष साधना धेंडे यांनी काढले. त्या इचलकरंजी येथील पुरस्कार प्राप्त कार्यक्रमात मिळालेल्या  बोलत होत्या. यावेळी कलाप्पाणा आवाडे, सागर खोत, निवेदिता माने, जयवंत राव आवळे, प्रकाश आवाडे, सुरेश हळवनकर यांचे  सह मान्यवर उपस्थित होते.

साप्ताहिक महालक्ष्मी टाइम्सव सप्तरंग कलामंचं बहु उद्देशीय सेवा भावी संस्था इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण  कार्यक्रमात त्या बोलत होत्या. साधना धेंडे-,कांबळे यांना राज्यस्तरीय 'आदर्श महिला भूषण 'पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, 'मेहनत सचोटी,चांगुलपणा व संघटन कौशल्य ,प्रामाणिकपणा हे गुण अंगी रुजवल्यास स्त्री ला सुद्धा  काही अशक्य नाही.  आजची स्त्री ही आता अबला न राहता ती सबला झाली आहे.प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती काम करत आहे. चूल आणि मूल या चौकटीतुन आजची स्त्री ही कधीच अंतराळात झेपावली आहे.अंगी प्रामाणिकपणा निष्ठा,व  संघटन कौशल्य या गोष्टीवर प्रामुख्याने भर दिल्यानेच मला कवठेमहांकाळ सारख्या शहरात पहिली नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला. लोकांच्या प्रचंड प्रेमामुळे,आशीर्वादामुळे  व त्यांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी केलेले जीवाचे रान या मुळेच हे यश संपादन करू शकले. ज्ञानार्जनाचे काम करत असत असतांना सुसंस्कृत,व जडणघडण यासाठीच आजवर प्रयत्नशील राहिले. घर,शाळा,समाजकारण आणि राजकारण उत्तम गृहिणी,राजकारण विरहित समाजकारण करण्यावर व विकासकांमावर नेहमीच भर दिला , म्हणूनच आज'महिला भूषण'पुरस्कार मिळाला,मला मिळालेला हा पुरस्कार माझ्यावर ,प्रेम करणाऱ्या तमाम कवठेमहांकाळ शहरातील नागरिकांचा व तमाम राज्यातील नारी शक्तीचा हा सन्मान आहे.त्यांनी आजवर दिलेल्या प्रेमरूपी आशीर्वादातुन मी कदापि उतराई होऊ शकणार नाही.यापुढेही आर आर आबा पाटील यांनी घालून दिलेल्या आदर्श राजकीय मार्गावर प्रामाणिकपणे मार्गक्रमण करून समाजातील तळागाळातील जनतेला न्याय देण्याचे व संघटना मजबूत करण्याचे काम या पुढेही करत राहीन.केवळ सत्ता आणि पद असल्यावरच लोकांच्या गळ्यातला ताईत  कोणीही होऊ शकतो पण सत्ता पद नसतांना लोकांच्यात राहून त्यांची कामे करत राहिल्यास,अडचणीला धावून गेल्यास आपल्यावरही जनता तितकीच निष्ठा व प्रेम भरभरून देते याची मला पूर्ण अनुभूती आली आहे. या आधीही बरेच पुरस्कार मिळाले पण आज मला महिला भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याचा आंनद होत आहे. ज्यावेळी एखादा पुरस्कार मिळतो त्यावेळी साहजिकच आपल्यावर एक जबाबदारी पडते. ती जबाबदरी पार पाडण्यासाठी प्रामाणिकपणे यापुढेही प्रयत्नशील राहीन.

  यावेळी कल्लाप्पा आवाडे यांना (सहकार श्री)अलका स्वामी(महाराष्ट्र वैभव)विनोदभाई घोडवत(उद्योग भूषण)नामदेव शिंदे( महाराष्ट्र पोलीस रत्न)विजय मानगांवे(समाजभूषण)हसीना शेख(आदर्श महिला प्रेरणा)अमृत भोसले(कुस्तीभूषण)प्रशांत पांढरपट्टे(समाजरत्न)राहुल मोटे(आदर्श कृषिमित्र)महादेव चौगुले(उद्योगरत्न),कल्पना भाटिया (आदर्श श्वानमित्र)चंद्रकांत जगताप(संगीतरत्न)गजानन कविशील(आदर्श दलीतमित्र)चंद्रप्रभा शिंदे(जीवनगौरव)तर अभिनेत्री सुरभी मसनाळे व दिगदर्शक सर्जेराव गायकवाड यांना कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

     यावेळी माजी खासदार निवेदिता माने प्रकाश आवाडे,आमदार उल्हास पाटील राजेंद्र  पाटील, सुधाकर मनोरे, हिंदुराव शेळके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 
Top