उस्मानाबाद :-

येथील श्रीकृष्ण गणेश मंडळ गवळीवाडा उस्मानाबाद प्लास्टिकचा भस्मासूर या देखाव्याचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  बालरोगतज्ञ डॉ. अभय शहापूरकर, ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा, नारायण बन्साळी, पोलीस निरीक्षक सुनील नेवासे, वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक धर्मसिंग चव्हाण, राजा वैद्य, संतोष जाधव, चंद्रसेन देशमुख, वैभव मोहन, अण्णा उंबरे यांची उपस्थिती होती. तसेच मंडळाचे मार्गदर्शक शिवाजी पंगुडवाले नगरसेवक, अमरसिंह देशमुख उद्योजक, यांची उपस्थिती होती.

 यावेळी मंडळाच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच मानवाच्या प्रशांत यांना Mens Sport Physique upto 174 cm या  कॅटेगरीमध्ये भरतीय संघात निवड झाल्याने  त्याचा सत्कार मंडळाच्यावतीने करण्यात आला तसेच जीवन जाधव तुळजाई मंगल कार्य सेवा, राजू जानवडकर कृपा मंगल कार्य सेवा, यांचाही सत्कार मंडळाच्यावतीने करण्यात आला तसेच मंडळाच्या वतीने परिसरातील दहावी-बारावी उत्तीर्ण झालेले व शिष्यवृत्तीधारक अशा एकूण तेरा गुणवंत विद्यार्थ्याच्या शालेय साहित्य भेट देऊन सत्कार करण्यात आला तसेच मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करताना राठोड साहेब म्हणाले की लोकमान्य टिळकांचा सार्वजनिक गणेश मंडळ स्थापन करण्यामागचा हेतू या मंडळाने जपला आहे मंडळाच्या वतीने दरवर्षी सामाजिक संदेश देणारे देखावे सादर केले जातात या वर्षीसुद्धा या मंडळाने प्लास्टिक बंदी हा देखावा सादर करून प्लॅस्टिक बंदी ही काळाची गरज आहे असे सांगून या उपक्रमाचे कौतुक केले त्यानंतर शहापूरकर यांनी आपले भाषण प्लास्टिक पासून होणारे दुष्परिणाम या विषयी माहिती सांगून या मंडळाच्या उपक्रमाबद्दल कौतुक केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष श्री चेतन भन्साळी, उपाध्यक्ष श्री चंद्रकांत इंगळे व मंडळाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप कुमार गोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन खंडू राऊत यांनी मानले.

 
Top