लोहारा (इकबाल मुल्ला) : 

सोलापूर शहरासह परीसरातील दुचाकी चोरीचे लोहारा कनेक्श असल्याचे तपासात उघड होत असून याप्रकरणी दि. 8 सप्टेंबर रोजी लोहारा शहरातील चौघा जणांना सोलापूर पोसिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संशयतांकडून दहा ते बारा दुचाकी जप्त केल्या असल्या तरी हा अकडा शंभरावर जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

सोलापूर शहरासह परीसरातील गेले अनेक दिवसापासून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीसाची चांगलीच डोके दु:खी वाढली होती.त्यात दुचाकी चोरीच्या जास्त तक्रारी या सोलापुर येथील सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्यामुळे याप्रकरणी सोलापूर पोलिसांनी तपास सुरु केला असता यामध्ये तुळजापूर तालुक्यातून एका तरूणाला संशयावरून ताब्यात घेतले.

दुचाकी चोरी संदर्भात पोलिसांनी कसून चौकशी केली असता दुचाकी चोरल्याचे कबुली देत लोहारा शहरातील काही तरूणांची नावे त्याने सांगितली. त्या अनुषंगाने सोलापूर येथील सदर बाजार पोलीस ठाण्याचे गुन्हा अन्वेशन विभागाचे पथक दि.7 सप्टेंबर रोजी दुपारी शहरात दाखल झाले. त्यानुसार पोलिसांनी काही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून दि.8 सप्टेंबर पर्यंत दहा ते बारा दुचाकी जप्तत केल्या आहेत.अजून मोठ्याप्रमाणात चोरीच्या दुचाकी असल्याचा संशय पोलीसांना व्यक्त केला आहे.त्यात दि.8 सप्टेंबर रोजी दुपारी सोलापुर गुन्हे अन्वेशन विभागाची टिम दाखल झाली आहे.त्यांनी ही त्याच्या पध्दतीने तपास सुरु केला आहे.

 
Top