नळदुर्ग :
तुळजापूर तालुक्यातील शिरगापूर जिल्हा परिषद शाळेला चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीने संगणक संच व दोन एलईडी टीव्ही संच दिले होते. आज शुक्रवार दि. 14 सप्टेंबर रोजी शिरगापूर शाळेत शिक्षक सचिन ढेपे यांनी ई-लर्निंग च्या माध्यमातून देण्यात येणा-या शिक्षणाची माहिती ग्रामस्थांनी दिली.
यावेळी ढेपे यांनी ई लर्निग च्या माध्यमांतून इतिहासातील हडप्पा व मोहोंजदडो संसक्रुती, सेमी इंग्लिश व विविध विषयाची माहिती दिली. यावेळी सरपंच अंकुश कदम, विनायक जाधव, माजी सरपंच महेश गायकवाड, धनाजी जाधव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ पाटील, धनाजी जाधव, विठ्ठल जाधव, बालाजी जाधव, कोंडण जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी विनायक जाधव यांया शाळेच्या गुणवत्तेचे कौतुक केले. याप्रसंगी मुख्याध्यापक कानडे सर यांनी ग्रामपंचायतीने संगणक संच देऊन ई लर्निग शिक्षण चा प्रश्न सोडविल्याबद्दल ग्रामंपचायतीचे आभार मानले.


