तुळजापुर : कुमार नाईकवाडी
भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपायी यांच्या स्मृतीस अादरांजली वाहण्यासाठी तुळजापुरात अटल काव्याजली हा कविता वाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कवीसंमेलनाचे उदघाटन प्रदेश भाजपा सदस्य अॅड. अनिल काळे, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर मुळे, माजी तालुका अध्यक्ष विजय शिंगाडे, जिल्हा चिटणीस गुलचंद व्यवहारे, संस्कार भारती प्रदेश सहसंघटनमंञी डाॅ.सतीश महामुनी, तुळजापुर अध्यक्ष पदमाकर मोकाशे, महिला अाघाडीच्या पैलवान, अॅड. स्वाती नळेगावकर यांची उपस्थिती होती.
या कवीसंमेलनात प्रसिध्द गझलकार शेखर गिरी, कवी देवीदास पाटील, विजय देशमुख, तानाजी पाटील, शंकर कसबे, कांचन तिगाडे, डाॅ. अानंद मुळे, पांडुरंग पवार, नरसिंग बोधले, सागर कदम, सागर पारडे यांनी कविता सादर केल्या. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नेते अॅड. अनिल काळे यांनी भारतरत्न अटलजींची एक लोकप्रिय कविता सांगितली. याप्रसंगी अटलजींच्या कीव्य प्रतिभेवर गझलकार शेखर गिरी यांनी मार्मिक भाष्य करून अापल्या कविता सादर केल्या.
याप्रसंगी संमेलनात भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षा मीना सोमाजी, शिवाजी गिड्डे, सुहास साळुंके, राजाभाऊ मलबा यींची उपस्थिती होती. सर्व प्रथम अटलजींच्या प्रतिमेचे पुजन करण्यात अाले. प्रास्तविक संयोजक गुलचंद व्यवहारे व अाभार सुहास साळुंके यांनी मानले.
