नळदुर्ग :

तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (नळ) या ठिकाणी मागील  २० ते २५ वर्षापासून एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात येत आहे. याही वर्षी ही परंपरा या गावात कायम आहे. 

हंगरगा नळ येथील शिवा तरुण गणेश मंडळाच्यावतीने मागील अनेक वर्षापासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यावर्षी मंडळाच्यावतीने वृक्षारोपण, शालेय विद्यार्थांचे स्पर्धा, आरोग्य शिबीर यासह समाजोपयोगी उपक्रम घेण्यात आले. 

मंडळाचे आधारस्तंभ संजय शिवशंकर वाघोले, अध्यक्ष किरण राजेंद्र वाघोले, खजिनदार रामेश्वर विश्वनाथ मुदगडे,  संदीप वाघोले, समर्थ पाटील, संतोष चौगुले, किरण चौगुले यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत.
 
Top