काटी (उमाजी गायकवाड) :-

तुळजापूर  तालुक्यातील काटी जिल्हा परिषद  केंद्रीय  कन्या  प्रशालेचे   मुख्याद्यापक सतिश  महादेव  संगमनेरकर या उपक्रमशील  शिक्षकास सपत्नीक  मंगळवार  दि. 11 सप्टेंबर रोजी  तुळजापूर  येथील  पंचायत समिती  सभागृहात राज्याचे माजी मंत्री  तथा विद्यमान  आमदार मधुकरराव चव्हाण  यांच्या हस्ते  तालुका स्तरीय  आदर्श शिक्षक पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. 

यावेळी  व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हा  अध्यक्ष अप्पासाहेब पाटील, माजी  जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य  धिरज पाटील, सभापती  शिवाजीराव  गायकवाड, गटविकास अधिकारी  ढवळशंक,  गटशिक्षण  अधिकारी  कमलाकर  धुरगुडे,  जिल्हा परिषद सदस्य प्रकाश  चव्हाण,  सौ.अस्मिता कांबळे, पंचायत समिती सदस्य  चित्तरंजन  सरडे,  शिक्षक  संघटनेचे नेते  लालासाहेब मगर, कल्याण  बेताळे, धनंजय  मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

काटी केंद्रात सतिश  संगमनेरकर  हे केंद्रीय  कन्या  प्रशालेत मुख्याद्यापक  पदावर कार्यरत असून  त्यांच्या  कार्यकाळात आजपर्यंत शैक्षणिक, सामाजिक  क्षेत्रात , शाळेत राबविण्यात येत असलेल्या  विविध उपक्रमात सक्रिय सहभाग  असतो. त्यांनी शाळेतील  विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक  गुणवत्ता  वाढीसाठी  केलेले प्रयत्न,  शाळेतील रंगवण्यात आलेल्या  बोलक्या  भिंती, शाळेत विद्यार्थ्याना देण्यात  येणारे  संगणकीय  ज्ञान,  शाळेत  घेण्यात  येणारे सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच  शाळेच्या  आवारात विविध  प्रकारच्या  झाडांचे वृक्षसंगोपन हा उपक्रम  अतिशय  उत्कृष्टरित्या राबवून शाळेच्या  आवारात  विविध  प्रकारची शोभेची झाडे  जोपासून  शाळेच्या परिसराला बागेचे स्वरुप  आणले आहे. अशा  विविध  प्रकारच्या  उपक्रमामुळे त्यांचे काम विद्यार्थी,  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  यांना  खुपच  प्रेरणादायी असून  त्यांच्या  कार्याची  दखल  घेऊन  पंचायत समितीच्या  वतीने  देण्यात येणारा तालुकास्तरीय आदर्श  शिक्षक पुरस्कार संगमनेरकर सरांना मिळाल्याने  त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
 
Top