तुळजापूर :- येथील श्री तुळजाभवानी महाविद्यालयात वाणिज्य विभाग व आकार फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षांवर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेमध्ये प्रा.राम वाघ आकार फाऊंडेशन पुणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी होण्यासाठी अगोदर ध्येय निश्चित करावे लागते,वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे.त्याचबरोबर योग्य विषयाची निवड करणेही गरजेचे आहे,तसेच त्यांनी यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोग व संघ लोकसेवा आयोग या परीक्षांबाबत संबंधित प्रश्नांचा आढावा घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एस.एम.मणेर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनि तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रा.एन.बी.काळे यांनी प्रास्ताविक केले तर प्रा.बी.के.नगरे यांनी सूञसंचलन केले. तर आभार प्रा.मारुति लोंढे यांनी मानले.