तुळजापुर (कुमार नाईकवाडी) :-

शहरात रविवार दि. ९ सप्टेंबर रोजी पारंपारिक पद्धतीने भक्ती भावाने दुष्काळाच्या सावटाखाली बैलपोळा सण साध्या पद्धतीने साजरा करण्यात आली.

गत वर्षी पाऊस काळ चांगल्या प्रकारे पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. परंतु यंदाचा पोळा सण पाऊस काळ नसल्यामुळे व महागाई मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे शहरवासियानी साध्या पद्धतीने पोळा सण साजरा केला. येथील भवानी रोडवरील भागात चिखल मातीचे व प्लॅस्टर ऑफ पॅरीसचे बैल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर आणले होते. बैलाच्या किंमती भरमसाठ वाढल्याने नागरीकांच्या खिशाला चाप बसला तरी ही देखील शहरवासियांनी बैल खरेदी करुन पोळा सण साजरा केला. सकाळ पासुन घरोघरी बैलाची यथासंग पुजा करण्यात आली. आज घरो घरी गोड पोळ्याचा नैवद करुन श्री कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेस दाखविण्यात आला.

 
Top