नळदुर्ग :- रिपब्लिकन पार्टी इंडियाची उस्मानाबाद जिल्हा आढावा बैठक जिल्हाध्यक्ष राजा लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. 9 सप्टेंबर रोजी नळदुर्ग येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. या बैठकीत पक्ष संघटन मजबुत करणे, पक्षाच्या पुढील ध्येय धोरणविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
सदरील बैठकीत तुळजापूर तालुका अध्यक्षपदी अमर जेटीथोर यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. तसेच नळदुर्ग शहर अध्यक्ष पदी सुरज कांबळे यांची निवड करुन शहर कार्यकारणी जाहिर करण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे यांचा वाढदिवसानिमित सत्कार करण्यात आला.
यावेळी जी. के. कांबळे, बाबु लालसरे, सोलापुर शहराध्यक्ष विनोद इंगळे, अल्पसंख्याक अध्यक्ष इमरान शेख, सोलापुर शहर उपाध्यक्ष मुन्ना पठाण, उमेश गायकवाड़, दिलीप भांगे, महेश कांबळे, करण लोखंडे, विशाल कांबळे, राकेश बनसोडे, गणेश बनसोडे, सुधाकर बनसोडे, देवा कांबळे, विकी कांबळे, मन्सूर शेख, फारूक पठाण, युसूफ शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.