तुळजापूर :- तालुक्यातील मौजे केशेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी लक्ष्मण क्षिरसागर यांची तर उपाध्यक्ष पदी सौ. अश्विनी अरूण जळकोटे यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक काशिनाथ देडे, घंटे, सदाफुले, कांबळे, जाकीर शेख, सूर्यकांत भिसे, मारूती पवार, काळू जाधव, चण्णापा साखरे, सचिन बागडे, केदार जळकोटे, अर्जुन घंटे, केदार उमाटे, सतिश पाटु, गणेश कांबळे, वैजिनाथ जळकोटे, मलीनाथ जळकोटे, शिवराज साखरे, विजयकुमार पाटु, अंकुश क्षिरसागर सह गावातील पालक वर्ग व महिला उपस्थित होते. याप्रसंगी नुतन पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला.