![]() |
योगेश चव्हाण |
पुणे (वसंत जाधव) :-
बंजारा समाजास एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी पोस्ट मोहीम राबविण्यात येत असून एक जात एक प्रवर्ग यानुसार या अभियानात बंजारा समाजानी मोठया संख्येनी सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय बंजारा मिशनचे लातूर युवा जिल्हाध्यक्ष योगेश चव्हाण यांनी केले आहे.
बंजारा समाज हा संपूर्ण भारतात विस्तारला असून 12 राज्यात या समाजास एससी चे आरक्षण तर 5 राज्यात एसटी चे आरक्षण आहे. मात्र महाराष्ट्र राज्यात या समाजास व्हीजेएनटी प्रवर्गाचे आरक्षण आहे. संपूर्ण देशात एक समान व एकच एसटी आरक्षण मिळावे, यासाठी सध्या राष्ट्रीय बंजारा मिशनच्यावतीने पोस्ट कार्ड मोहीम राबविण्यात येत आहे.
या पोस्ट कार्ड अभियानाचा शुभारंभ पुणे येथुन वसंत जाधव व कुलदिप काळे यांनी केले होते. तेव्हापासुन पुर्ण महाराष्ट्र व देशातुन यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरी राहिलेल्या समाज बांधवानी या पोस्ट कार्ड अभियानात सहभाग घेऊन बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी सहकार्य करण्याचे आहवान योगेश चव्हाण यांनी केले आहे.