काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर  तालुक्यातील मंगरूळ येथे स्त्री  जन्मानंतर तिची अवहेलना  करणार्‍या किंवा  गर्भपात  करणार्‍या  समाजाला मंगरुळ येथील पोलीस  पाटील पदावर कार्यरत  असलेल्या लक्ष्मण  माळी कुटूंबियांनी बसस्थानक  ते घरापर्यंत  रांगोळी,  व फुलांनी सजावट करुन  बॅन्डपथकासह फटाक्यांची  आतषबाजी करीत स्त्री  जन्माचे अनोख्या पद्धतीने  स्वागत करीत समाजातील  अनिष्ट परंपरेला चपराक   देण्याचा प्रयत्न केला आहे. 



मंगरुळ  येथील पोलीस  पाटील  या पदावर कार्यरत  असणाऱ्या  लक्ष्मण  माळी यांना त्यांच्या माळी कुंटूबात पाच पिढ्यानंतर मुलगी  जन्माला  आली. त्यामुळे  माळी कुटुंबात  आनंदाला पारावर  राहिला नाही. माळी कुटुंबातील सदस्यांनी मुलीला दवाखान्यातून गावात आणल्यानंतर  मुलीच्या जन्मानिमित्त बसस्थानक  ते घरापर्यंत  रांगोळी, व रस्त्यावर  फुले अंथरून  बॅन्डपथकासह  व फटाक्यांची आतषबाजी करीत गावातून  मिरवणूक  काढून अनोख्या पद्धतीने स्त्री जन्माचे स्वागत केले आहे. याप्रकारे समाजाला एक संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.  गर्भपात करणार्‍या अनेक  घटना सध्या  घडत असताना  माळी कुटुंबियांनी मात्र या सर्व घटनेला छेद देण्याचा प्रयत्न केला आहे. या माळी  कुटुंबीयांतील सदस्यांनी स्त्री जन्म मोठ्या थाटमाटात साजरा केला आहे. मुलगी झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांनी  गावातील  रस्त्यावर  रांगोळीची सजावट व जिलेबी वाटून स्त्री जन्माचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.



एखाद्या लग्न सोहळ्याला लाजवेल अशा पद्धतीने या मंगरुळ  येथील  माळी  कुटुंबीयांनी आपल्या घरी जन्मलेल्या मुलींचे स्वागत केले आहे. तर मुलीच्या जन्माचे या अनोख्या पद्धतीच्या स्वागत सोहळ्याची संपूर्ण पंचक्रोशीत जोरदार चर्चा आहे. त्याच बरोबर या उपक्रमामुळे मुलींची गर्भात हत्या करणाऱ्या नराधमांना चपराक बसली आहे. या निमित्ताने माळी कुटुंबीयांनी मुली वाचवा असा संदेश दिला आहे.



स्त्री  जन्माचे स्वागत  करताना मिरवणूकी दरम्यान  विनायक हजारे, गेनदेव हजारे,वैजिनाथ हजारे, राम बचाटे, अमोल लबडे, अमर जाधव, संभाजी सरडे, सचिन माळी, राम माळी, अप्पा जेटोथोर, राजकुमार परधे, विपीन माळी, उमेश माळी, पारप्पा पाटील, महादेव जाधव,पैगंम्बर पठाण,विजय कलबटे, पांडुरंग हजारे, एकनाथ माळी, गोविंद डोंगरे, आदेश जगताप, अजय तांबे, दीपक पारधे, मिलिंद जेटीथोर, राम माळी, अप्पाराव हजारे, हरिश्चंद्र शिनगारे आदीसह मित्रकंपनी, नातेवाईक सहभागी झाले होते. 


 
Top