कळंब : भिकाजी जाधव

दि. 18 सप्टेंबर रोजी पर्याय संस्था व सुमंत मुळगावकर डेव्हलपमेंट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभाग्रह कळंब येथे नागझरवाडी, शिंगोली, वाघोली येथील  महिला शेतक-यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. 

या प्रशिक्षणात प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, कुकूटपालन, सेंद्रीय शेती, शासन योजना या विषयावर मार्गदर्शन करताना पर्याय चे प्रमुख मा. विश्वनाथ अण्णा तोडकर यानी शेतक-यांचे जिवनमान उंचावण्यासाठी पर्याय गावागावात, नाला खोलीकरण रुंदीकरण, बांधबंदिस्ती, शेतक-यासाठी अभ्यास सहल,महिलांचे बचत गट, विवीध विषयाच्या प्रशिक्षणाचे आयोजन करत आहे. गावातला शेतकरी सुधारला पाहिजे, शेतक-यांच्या उत्पादनामध्ये वाढ झाली पाहिजे, गावच्या शिवारात पाण्याचा साठा वाढला पाहिजे, शेतक-यांनी शेती आधारीत उद्योग व्यवसाय सरु केले पाहिजे, शेतक-यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती केली पाहिजे. 

शेतक-यांनी शाश्वत शेती केली पाहिजे, पाण्याचे सुक्ष्म नियोजन केले पाहिजे, पाण्याचा गैर वापर टाळला पाहिजे, यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. राजगरु साहेब यांनी जिल्हापरिषद व, पंचायत समिती कडून शेतक-यासाठी च्या योजनांची माहिती दिली. त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी मा. संसारी साहेब यांनी शेतक-यानी हायटेक शेती करून आपल्या शेतीचा विकास करावा व कृषी कार्यालयाकडून वेगवेगळ्या योजनांचा लाभ घ्यावा असे आव्हान  केले. 

यावेळी विलास गोडगे, आशोक तोडकर, सुनिल कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्याय चे कार्यकर्ते बालाजी शेंडगे, सुनंदा खराटे, आशोक तोडकर, विलास गोडगे , विकास कुदळे, असिफ मुलानी, सुनील कांबळे, दत्तात्रय ताटे, आश्रुबा गायकवाड, जयश्री शेनमारे, सुनिता मते, हनुमंत धोंगडे, नर्सिंग मते, यांनी परीश्रम केले. तर आश्रुबा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.
 
Top