![]() |
| अध्यक्ष - बाळासाहेब भाले |
काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे मंगळवार दि. 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विद्यासागर ढगे, संस्थापक सचिव तथा मंडळाचे मार्गदर्शक निवृत्ती भोजने यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या येथील महात्मा फुले नवरात्रोत्सव मंडळाच्या बैठकीत सावता परिषदेचे जिल्हा युवा अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पांडुरंग भाले तर उपाध्यक्षपदी अंकुश विलास वाघमोडे यांची एकमताने निवड करण्यात आली.
![]() |
| उपाध्यक्ष - अंकुश वाघमोडे |
उर्वरित कार्यकारणीत खजिनदारपदी रामेश्वर ढगे, व सचिन भोजने यांची तर सहखजिनदारपदी अमोल वेदपाठक, व अशोक हेडे, मंदीर व्यवस्थापदी संजय साळुंके, प्रभाकर चवळे, नवनाथ सुरडकर, संतोष काळे, महेश काळे, गणेश कवठे, सतिश भाले, अनिल ढगे यांची तर ज्योत व्यवस्थापदी जयदीप भोजने, श्रीकांत भोजने, व अविनाश ढगे यांची निवड करण्यात आली. लेझीम व मिरवणूक प्रमुखपदासाठी हणुमंत म्हेत्रे, हर्षवर्धन माळी, ज्योतिराम चवळे, रामचंद्र गवंदारे, सोमनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
मंडळाचे हे 37 वे असून या कालावधीत महापुजा, आरती, अन्नदान, प्रवचन, आराधी मंडळाची गाणी, होम हवन, रांगोळी स्पर्धा असे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या नवरात्रोत्सव कार्यकाळात मागील 37 वर्षापासून मंडळाचे कार्याध्यक्ष निवृत्ती भोजने हे सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अखंडितपणे प्रयत्न करीत आहेत. या निवडी दरम्यान मंडळातील सर्व पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

