तुळजापुर : कुमार नाईकवाडी

तालुक्यातील मंगरुळ हॉटेल वरील कामगारास पाण्याची बाटली देण्याच्या कारणावरुन शिविगाळ करुन लाथाबुक्यानी मारहाण केल्याची घटना मंगळवार दि. 18 रोजी रात्री साडे दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. 

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवार दि.१८ रोजी राञी साडे दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील मंगरुळ येथे हाँटेल मालक अमोल उमाकांत जांभळे रा.मंगरुळ ता तुळजापुर यास व त्याच्या   कामगारास पाण्याची बाटली देण्याच्या कारणावरुन, संतोष  सदाशीव यमगर  रा.यमगरवाडी ता.तुळजापुर  यांनी व त्याच्या सोबत असलेल्या चार अनोळखी इसमानी  शिविगाळ करीत लाथाबुक्यानी मारहान केली त्यांच्या सोबत असलेल्या शंकर सदाशीव यमगर यांने हातात काठी घेऊन वस्ताद शेखु तांबोळी याच्या डोक्यात मारुन गंभीर जख्मी केले. अमोल उमाकांत जांभळे यांच्या फिर्यादीवरुन तुळजापुर पोलीस ठाण्यात गु.र.न.294/18 कलम 143,147,148,149,326,323, 504 भा.द.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास उपपोलीस नि.माने करीत आहेत.
 
Top