तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी, कोट्यावधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेस पुणे येथील देवीभक्त शुक्राचार्य नामदेव पाषानकर यांनी गेल्या दोन वर्षापुर्वी श्री तुळजाभवानी मातेस कौटुंबिक अडचणी सदंर्भात साकडे घातले होते. त्या साकड्याचे गा-हाणे श्री तुळजाभवानी मातेने पुर्ण केल्याने बुधवार दि. १९ सप्टेंबर रोजी सहकुंटुब सहपरिवार येवुन श्री तुळजा भवानी मातेची कुलधर्म कुलाचार पुजा करुन नवस पुर्ती ५ तोळे १२० मि.ली.सोन्याची मोहन माळ श्री देवीस अर्पण केली. त्यांची अंदाजे किमंत १ लाख २ हजार रुपये आहे.
यावेळी त्यांचे पारंपरिक पुजारी नागेश कालीदास सांळुके यांनी पाषानकर कुंटुबांची यथा सांग पुजा करवुन भरभरून आशीर्वाद दिला.
