उस्मानाबाद‍ :

कबड्डी चे राष्ट्रीय  खेळाडू व एसटी इंटकचे झुंजार कामगार नेते प्रतापभाऊ हुंडेकर (वय ७२) यांचे अल्प आजाराने पुणे येथील खाजगी रूग्णालयात निधन झाले. त्याच्या पार्थिवावर शुक्रवार दि.२१ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता तुळजापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जवाहर तरूण क्रीडा मंडळ तुळजापूरचे प्रमुख आधारस्तंभ असलेले प्रतापभाऊ हुंडेकर यांनी उस्मानाबाद, लातुर जिल्हा एकत्र असल्यापासुन उस्मानाबाद डीव्हीजन चे इंटक संघटनेचे जनरल सेक्रेटरी म्हणून कामास सुरूवात केली.आक्रमक कामगार नेता म्हणून ते कामगार वर्गात प्रिय होते.महाराष्ट्र शासनाचा त्यांना गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला होता. क्लर्क म्हणून कामास लागलेले प्रताप हुंडेकर निवृत्त होताना सहाय्यक वाहतूक अधिकारी म्हणून त्यांनी कार्य केले होते. कामगारांचे प्रश्र सोडविताना त्यांचे रोख-ठोक वक्तव्य असल्याने इंटक संघटनेचा प्रभाव वाढण्यास मोठी मदत झाली होती. 

महाराष्ट्र शासनाच्या कामगार वेतनवाढ कमिटीवर इंटक संघटनेचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले. प्रताप हुंडेकर यांच्या पश्चात चार भाऊ, एक बहिन, पत्नी, मुले, पुतने, नातू, पंतू असा मोठा परिवार आहे.

 
Top