अक्कलकोट : रियाज सय्यद

शहरातील भारत गल्ली येथे भारत गल्ली तरुण मंडळ गणेश मूर्ती प्रतिष्ठापना केली आहे. तसेच आज मोहरमचा सण आहे. यामुळे हिंदू मुस्लिम समाजातील युवकांनी एकत्र येऊन गणेश बरोबर मोहरमचे पंजे त्याच मंडपात बसविले आहेत. भारत गल्ली तरुण मंडळ आणि घुमूट पंजे यांचे युवक एकत्र आले आणि त्यांनी सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

मागील वर्षी नवरात्रोत्सव काळात मोहरमचा सण आला होता. त्यावेळी या युवकांनी मिळून देवीच्या मंडपात पंजे स्थापन केले होते. यावर्षी असाच योग गणेशोत्सव काळात जुळून आल्याने या युवकांनी एकत्र येत पूजाविधी धार्मिक परंपरेप्रमाणे आणि एकत्रित करत समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याचे संयोजन महिबूब हगलदीवटे, अंबिर हगलदिवटे, सैपन हगलदिवटे, दाऊद हगलदिवटे, सागर शिंदे, विकास गडदे, विश्वजीत पाटील, केदार तोडकर, रवी बणजगोळ, समर्थ शिरसाट, आकाश विभुते आदी युवक कार्यकर्ते करीत आहेत.
 
Top