तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजा भवानी मातेच्या येणाऱ्या शारदीय महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील घाटशीळ रोडवरील कारपार्कींग येथे 300 बाय 200 फुट साइजचे वाटर फ्रुप दर्शन मंडप (पञाशेड) व्यवस्थापन मंडपाचे भुमीपुजन गुरुवार दि. २० सप्टेंबर रोजी श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत श्री तुकोजी बुवा यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी जवाहर मंडप कॉन्टॅक्टर दत्ता भोसले, स्वप्नील भोसले, श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी कुमार इंगळे, आण्णासाहेब भोसले, ञिशुल मंडप काँन्टॅक्टर दत्ता गवळी, बाळासाहेब शिंदे, श्री तुळजाभवानी मातेचे सेवेदार दुर्गेश छञे आदींची उपस्थिती होती.
तुळजापूर येथील घाटशीळ रोड वरील कार पार्कींग या ठिकाणी शारदीय नवराञ महोत्सवामध्ये श्री देवी भक्ताचे दर्शन सुलभ रितीने व्हावे यासाठी येथील नगर परिषद मार्फत 300 बाय 200 फुट साईज चे वाटर प्रुफ दर्शन मंडप (पञा शेड) उभारण्यात येत असुन याचे टेंडर नगरपरिषद मार्फत इ-निविदाद्वारे मंजुर ठेकेदार जवाहर स्पिकर व मंडप काँन्टक्टर तुळजापुर हे करीत आहेत. 300 बाय २०० च्या भव्य दिव्य दर्शन व्यवस्था मंडप उभारण्यात येत असुन या मध्ये ६० बाय ३०० फुट मध्ये ३ भाग होणार आहेत. या मध्ये धर्म दर्शन, मुख दर्शन, अभिषेक रांगा उभारण्यात येणार आहेत तसेच विश्रांती कक्ष आदीसह व्यवस्था करण्यात येणार आहेत.

