जिल्हा पोलीस अधिक्षक आर राजा

तुळजापुर :  कुमार नाईकवाडी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदी मायाशक्ती श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दि. २० रोजी उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधिक्षक आर राजा यांनी संपुर्ण मंदीर परिसरातील दर्शन मंडपाची  व येथील घाटशीळ रोडवरील कार पार्कींग दर्शन व्यवस्थेची केली. तसेच शहरातील सर्वच रस्त्याची पाहणी केली.

येणाऱ्या शारदीय नवराञ महोत्सवात श्री देवी दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातुन देवी भक्त दर्शनासाठी येत असतो. त्यामुळे नवराञ काळात भाविकांसाठी कडक सुरक्षा पोलीस बंदोबस्त ठेवुन आता पासुनच पोलीस प्रशासनाने कामाला लागावे, अशा सुचना पोलीस प्रशासनास यावेळी जिल्हा पोलीस पोलीस अधिक्षक आर राजा यांनी दिल्या. 

शहरात ठिक किकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्या ठिकाणाहून देवी भक्तांचा रुठ आहे त्या ठिकाणची पहाणी करुन दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांना व्यवस्थित रित्या दर्शनास सोडण्यात यावे कुठलाही अनुचित प्रकार होवु नये याची पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी जेणेकरुन देवी भक्तांना कुठलाही ञास होवु नये याची दखल पोलीस प्रशासनानी घ्यावी, अतिशय चांगल्या प्रकारे श्री तुळजा भवानी मातेचा शारदीय नवराञ महोत्सव सुरळीत पार पाडावा, असे यावेळी आर राजा यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा पोलीस उपअधिक्षक स्वाती भोर, होम डिवाय एस.पी. श्रीमती अनुराधा गुरुव, तुळजापुर उपविभागीय सहाय्यक अधिकारी  संदीप घुगे, पोलीस निरीक्षक संजय बाबर, तुळजापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेद्रं बोकडे आदीसह पोलीस अधिकारी उपस्थित होते.
 
Top