काटी : उमाजी गायकवाड

जलस्त्रोतांचे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द शाळेतील तिसरी वर्गातील मुलांनी बादलीतील पाण्यात गणपतीचे विसर्जन केले लहान मुलांना निसर्गाला साह्यभूत ठरेल असे उत्सव साजरे करणे त्यांचा आनंद देणे तसे समाजासाठी उपयुक्त असा संदेश चिमुकल्यांकडून देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते. उपक्रमशील शिक्षक विठ्ठल नरवडे यांच्या कल्पनेतून याचे आयोजन झाले. यावेळी मुलांनी शाळा परिसरात विसर्जनाचा वेगळा अनुभव घेतला .

शाळेत मुलांनी मातीचे पर्यावरणपूरक गणपती बनवले होते या गणेशमूर्तीचे विसर्जन अनोख्या पद्धतीने करण्यात आले उपक्रमशील शिक्षक विठ्ठल नरवडे यांनी अशा विसर्जनाच्या आवश्यकता व महत्त्व मुलांना समजावून सांगितले गणपतीबरोबर सर्व निर्माणही पाण्यात टाकले जाते त्यामुळे जलस्रोत प्रदूषित होतात त्यासाठी निर्माल्य पाण्यात न टाकता ते जमा करून त्यापासून खत तयार करता येते.तसेच पाण्याचे उपयुक्तताही टिकून रहाते त्यामुळे आपण अशा पद्धतीने उत्सव साजरे केल्यास ते निसर्गाच्या हिताचे व समाजासाठीही उपयुक्त ठरतील .त्यामुळे सध्याच्या काळात गरजेचे असलेले उत्सवाचे स्वरूप असावे मुलाने हा आधुनिक दृष्टिकोन समोर ठेवण्याचे आवाहन केले .

तसेच विसर्जनानंतर बादलीतील पाणी शाळा परिसरातील झाडांना घालण्यात आले त्याचा झाडांच्या वाढीसाठी उपयुक्त होऊन त्याचे महत्त्वही मुलांच्या लक्षात येईल शिवाय मूर्ती बनवण्यासाठी निसर्गातून घेतलेली माती व पाणी परत निसर्गात विलीन झाले निसर्गाचे घेणे व निसर्गाला देणे हा भाव यातून जपला गेला तसेच बुद्धीची देवता गणेश याबद्दलची आपली भक्ती वेगळ्या मार्गाने यातून दाखवली गेली अनेक ठिकाणी विसर्जनानंतर मूर्ती अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात पिंपातील छोट्या मुळात आधुनिकता व परंपरा यांच्या समन्वयातून हा उत्सव साजरा केला समाजातील इतर घटकांसाठी ही एक वेगळा संदेशही दिला गेला पर्यावरणपूरक गणेश विसर्जन सध्याच्या काळाची गरज बनली आहे पर्यावरण बचाव सहलीसाठी शाळेतील मुलांनी याद्वारे आपला खारीचा वाटा उचलला .

 यावेळी शाळेचे मुख्याध्यापक देवीदास गायकवाड, विठ्ठल नरोडे शिवाजी वेदपाठक, मनोज पाटील, माधव मोरे, बाळू मुंडे, प्रशांत वैद्य, रामलिंग दराडे हे उपस्थित होते.


 
Top