तुळजापूर :

सामाजिक भावनेतून मुख्यमंत्री निधीतून ह्दय शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत मिळवून दिल्ल्याबद्दल मकरंद लबडे यांचा तांबोळी परिवार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारा राजे शिवछत्रपती ग्रुपच्या  वतीने  सत्कार  करण्यात आला.

तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील मुस्लीम समाजातील  शहानुर ताबोळी यांचा नातू हनीफ याकूब तांबोळी (वय  16महीने) याला जन्मताच त्याच्या हदयाला छिद्र होते. परंतु तांबोळी कुटूंबांची परिस्थिती नाजूक असल्याने ऑपरेशन खर्च त्यांना झेपत नव्हते. मात्र मंगरुळ येथील भाजपाचे मकरंद लबडे यांनी भाजपाचे युवा नेते रोहन देशमुख व प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे यांच्या सहकार्याने  मुख्यमंत्री निधीतून मुबंई येथील  रूग्णालयात उपचार करण्यासाठी दोन लाख तीस हजार रुपयांची मदत मिळवून दिली.  नुकतेच हनीफ तांबोळी याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. 

मंगरुळ येथे मकरंद लबडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी याकूब तांबोळी, अजीज तांबोळी, अगंदभाई सलगर, सुनिल जाधव, गोविंद डोंगरे. शिवछत्रपती मंडाळाचे मनोज डोंगरे, आदमशा फकीर, अमर जाधव, तानाजी सोनटक्के आदीजण उपस्थित होते.
 
Top