मुरूम :

एकात्मक बाल विकास सेवा योजना नागरी प्रकल्प उस्मानाबाद अंतर्गत अंगणवाडी सेविकांच्या वतीने मुरूम ता. उमरगा येथे बुधवार (दि 19) रोजी पोषण आहार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

उमरगा तालुक्यातील मुरुम येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या सभागृहात अंगणवाडी सेविकांच्या वतीने बुधवार (दि 19) रोजी आहार प्रदर्शन,सकस पोषण आहार सप्ताह पार पडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील हे होते.या प्रसंगी मुख्याध्यापक बालाजी गाडेकर,धनराज गिरी सर,हणमंत शिंदे,उल्हास गुरगुरे,पर्यवेक्षिका जया दूधभाते,डॉ सुवर्णा पाटील,ग्रामीण रुग्णालयाच्या राजश्री जाधव,मिना खटके आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच अंगणवाडी सेविकांच्या वतीने पुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

या वेळी डॉ सुवर्णा पाटील मॅडम यांनी गरोदर मातांना शास्त्र आधारित सर्व जीवनसत्त्व युक्त पोषण आहार देण्यामागील महत्त्व पटवून सांगत कुपोषनाची सविस्तर माहिती दिली.यावेळी शरण पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात अंगणवाडी सेविकांच्या अडीअडचणी सभागृहात मांडून सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.मुख्याध्यापक हणमंत शिंदे,उल्हास गुरगुरे,नगरसेवक श्रीकांत बेंडकाळे,किरण गायकवाड आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी समुद्रे यांनी केले तर शाईन अत्तार यांनी उपस्थितांचे आभार मानले.या प्रसंगी मनीषा माने,भाग्यश्री घोडके,तन्वीर मुल्ला,रेश्मा कांबळे,स्नेहल गोडबोले, वंदना बने,भाग्यश्री पन्हाळे आदींसह मुरूम येथील अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top