सांगली : राजेश पाटील
सांगलीची कन्या आक्रमक क्रिकेटपटू स्मृती मानधना हिला क्रीडा क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा'अर्जुन'पुरस्काराने जाहीर झाला आहे. .कबड्डीपटू राजू भावसार, बुद्धिबळपटू भाग्यश्री साठे-ठिपसे व स्मृतीच्या रूपाने तिसऱ्यांदा सांगलीला हा बहुमान मिळाला. त्यामुळे सांगलीतील क्रिकेट, स्मृतीचे आई-वडील, तिचे प्रशिक्षक व संपूर्ण सांगलीकरांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. या बरोबरच ग्रामीण भागात ही जल्लोषाचे वातावरण असून सगळीकडे आनंदी -आनंद आहे.
स्मृतीचे वडील म्हणाले, 'मानाचा समजला जाणारा हा 'अर्जुन 'पुरस्कार मिळाल्याने आनंद गगनात मावेनासा झाला आहे. लहान-पणापासून तिने घेतलेल्या कष्टाचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले. तिचे प्रशिक्षक म्हणून तिला मार्गदर्शन करणारे अनिल जोग यांचे मोलाचे धडे तिला मिळाले म्हणूनच ती हे यश मिळवू शकली.
स्मृतीला लहानपणापासून क्रिकेटची प्रचंड आवड होती, तिची या क्षेत्रात करिअर करायचंय ही जिद्द अफलातून होती. शिवाय तिच्या मनाची एकाग्रता ही वाखाण-ण्यासारखी आहे. तीला हा पुरस्कार मिळाला असल्याने आता भविष्यात सांगलीत क्रिकेटला सोनियाचे दिवस येतील अशी चर्चा या निमित्ताने सगळीकडे रंगू लागली आहे.
1987 साली भाग्यश्री साठे-ठिपसे (बुद्धिबळपटू)तर राजू भावसार(कबड्डीपटू)यांना हे अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.आता स्मृतीच्या रूपाने सांगलीला हा बहुमान तिसऱ्यांदा मिळतो आहे.सांगलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा या निमित्ताने रोवला गेला आहे.यामुळे साहजिकच सांगलीच्या वैभवात भर पडली आहे.भविष्यात ही क्रिकेट ला सांगलीतूनच चांगले दिवस येतील अशी अपेक्षा क्रिकेट प्रेमींना आहेत.शहरासह ग्रामीण भागात यामुळे आनंदाचे वातावरण आहे.
