बारुळ : सुधीर सुपनार
तुळजापूर तालुक्यातील बारुळ येथे सोमवार दि. 17 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांचा हस्ते स्वच्छता ही सेवा या अभियानाचे शुभारंभ करण्यात आला.
सदरील अभियान हे दि. १७ सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर २०१८ या कालावधीत चालणार आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालय, मंदिर, मशिद, दवाखाने या सारख्या सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्याच बरोबर मौजे बारूळ गाव हे लवकरच हागणदारीमुक्त करण्यात येईल व पुढील वर्षी गाव संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छते स्पर्धेत भाग घेईल असा विश्वास कोलते यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तुळजापूर पंचायत समितीचे सभापती शिवाजी गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनमंत वडगावे , सहाय्यक गट विकास अधिकारी मोहन राउत, रमाकांत गायकवाड, सरपंच शहाजी सुपनार, गट शिक्षण अधिकारी कमलाकार धुरगुडे, चेअरमन बाबुराव ठोंबरे, उपसरपंच अनिता रणदिवे आदीजण उपस्थित होते.
यावेळी स्वयं सहाय्यता बचत गटाच्या कार्याची पाहणी करून महिलांना प्रत्येक क्षेत्रात कार्य करण्याची गरज असल्याचे सभापती गायकवाड यांनी मत माडले. भवानी शंकर शेतकरी उत्पादक गटाच्या कार्याची पाहणी करून त्यांचे कौतुक करण्यात आले. यासाठी ग्रामसेवक के.ए केवळराम मु.अ.बी.बी.सरडे , विस्तार अधिकारी श्रीमती अरुणा कांबळे, युवराज वट्टे भीमाशंकर होर्टे, एजे. मुलाणी, श्रीमती एस.के. जाधव, यु.आर भोसले, परिचर एम आर. राजगुरू, संजय ठोंबरे, भास्कर सगट, शिवराम होर्टे , शिवानंद स्वामी , चंद्रकांत वट्टे, कमलाकार ठोंबरे, नबीलाल शेख, दादा चौधरी , यशवंत मस्के, सुनील नवगिरे, शिवाजी सगर, सह गावातील महिला ग्राम संघाच्या सर्व पदाधिकारी, बचत गट महिला, आरोग्य, शिक्षण विभागाचे सर्व कर्मचारी व गावकरी मोठ्यां संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचलन युवराज वट्टे यांनी केले तर आभार नबीलाल शेख यांनी मानले या वेळी महिला व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
