तुळजापूर :
शुक्रवार दि. 28 सप्टेंबर ते दि. 30 सप्टेंबर या कालावधीत तुळजापूर येथे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी याचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन जि.प. सदस्य ॲड. धिरज पाटील यांनी केले आहे.
स्व. माणिकराव कदम-पाटील चॅरिटेबल ट्रस्ट तुळजापूर, मानव कल्याण हितवादी सेवाभावी संस्था मुंबई व एचव्ही देसाई आय हॉस्टिपल पुणे यांच्या संयुक्त विदयमाने तुळजापूर येथे दि. 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत सदरील शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता तुळजापूर येथील चर्मकारी गल्ली, रोहिदास मठ या ठिकाणी शिबीर होणार असून त्याचदिवशी सकाळी साडे नऊ वाजता नगरपरिषद शाळा क्रं. 2 घाटशिळ रोड, तसेच शनिवार दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता मंकावती गल्ली, विठ्ठल रुक्मिणी मंदीर, साडे नऊ वाजता सांस्कृतिक सभागृह, जिजामाता नगर, रविवार दि. 30 सप्टेंबर रोजी सांस्कृतिक सभागृह तुळजापूर खुर्द या ठिकाणी हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
तरी या शिबीराचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन, ट्रस्टचे अध्यक्ष तथा विदयमान जि.प. सदस्य ॲड. धिरज पाटील यांनी केले आहे.
