नळदुर्ग :

मुर्टा ता. तुळजापूर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मैलारपुर तांडा येथील एका युवकाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवार दि. 17 सप्टेंबर रोजी सकाळी साडे सात वाजण्यापूर्वी घडली. 

संजय कंटुराम जाधव (वय 36 वर्षे, रा. मैलारपुर तांडा, ता. तुळजापूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. यातील संजय जाधव यानी मैलारपूर तांडा येथील राहत्या घरात पत्र्याच्या आडूला ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची मयताचा भाऊ राजेंद्र कंटुराम जाधव (वय 45 वर्षे, रा. मैलारपुर तांडा) यांनी पोलिसात खबर दिली. याप्रकरणी आकस्मत मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार सुरवसे हे करीत आहेत.

 
Top