काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील गवळेवाडी  येथील एक महिलेचा स्वाइन फ्लूमुळे  सोलापूर येथील खासगी रुग्णालयात  उपचारादरम्यान शनिवारी (दि. २२)  मृत्यू झाला होता तर  अन्य एका बालकाला याची  लागण झाल्याच्या संशयामुळे त्याच  रुग्णालयात उपचार सुरू असताना  मृत्यू झाला होता. परंतु  त्या बालकाचा मृत्यू  स्वाईन फ्लूने नाही  तर  काविळीने  झाला असल्याचे सावरगाव  प्राथमिक  आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी  सौ.  स्मिता लोंढे  यांनी सांगितले. नव्या स्वैअन फ्लू  विषाणू  तीव्र  संसर्ग  पसरवतात  व याचा  प्रसार माणसापासून  माणसाला  होतो. व फ्लू  विषाणू  बाधित  व्यक्तीच्या खोकल्याने किंवा  शिंकण्याने हवेत उडणार्‍या तुषारातील विषाणू  धुलिकणावेष्टीत स्वरुपात  जीवंत राहत असल्याने  त्याचा संसर्ग  नाकातून  किंवा  तोंडातून पसरतो. त्यातच येथील  महिलेचा मृत्यू स्वाईन  फ्लूने झाल्यामुळे  ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण  निर्माण झाले  असून अनेकजण गावा सोडून बाहेर  गेले तर अनेकजण  शेतातील  वस्तीवर राहण्यास गेले आहेत.  

स्वाईन  फ्लू  नियंत्रणासाठी आरोग्य  यंत्रणा  सज्ज

येथील महादेवी अनंत माने वय  (32 )  यांचा स्वाईन  फ्लूने मृत्यू  झाल्याने तालुका  आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून मागील तीन  दिवसापासून ठाण मांडून आहे. घरोघरी जाऊन  औषधोपचार,  तपासणी,  प्रतिबंधात्मक काळजी कशी घ्यावी,  धोक्याची  चिन्हे, त्यावर उपाय  याबाबत काळजी घेत आहेत. परंतु नाकातोंडावर मास्क झाकणे ही सर्वात  प्रभावी दक्षता मानली जाते. परंतू  स्वाईन फ्लू  नियंत्रणासाठी सतर्क असलेल्या व औषधोपचार  करणार्‍या  आरोग्य अधिकारी,  कर्मचारी  यांनाचा मास्कचा तुडवडा जाणवला तर सर्वसामान्य नागरिकांना पुरवठा कधी होणार  असा प्रश्न ग्रामस्थांमधून  चर्चिला जात  आहे. दरम्यान येथील  शाळा बंद ठेवण्यात आली आहे. यावेळी सावरगाव प्राथमिक  आरोग्य  केंद्राच्या आरोग्य अधिकारी सौ. स्मिता लोंढे यांनी  येथील पाणी दुषित असल्याचे सांगून  घाणीचे  साम्राज्य  पसरले  असल्याचे नागरिकांना योग्य  ती खबरदारी  घेण्याचे आवाहन केले.

आमदार  चव्हाण  यांची गवळेवाडीला भेट

बुधवारी सायंकाळी  पाच वाजता आमदार  मधुकरराव चव्हाण  यांनी  गवळेवाडीला भेट देऊन मयत कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे  सांत्वन केले. यावेळी तालुका  आरोग्य अधिकारी  अन्सारी,  आरोग्य  अधिकारी डॉ.  सौ. स्मिता  लोंढे यांच्याशी नागरिकांच्या आरोग्याविषयी चर्चा  करून योग्य  त्या उपाययोजना  करण्याच्या  सूचना दिल्या.  यावेळी  नागरिकांना आरोग्य  विषयी खबरदारी  घेण्याचे आवाहन  केले. 

गाटे व  पाटील, लिंगफोडे  शेख, कदम कुटुंबियांचे सांत्वन


बुधवारी  सायंकाळी मयत कै. अभिमान  गाटे, वाणेवाडी येथील कै. शकुंतला  पाटील,  सावरगाव  येथील कै.कडाप्पा लिंगफोडे,  कै. महिबुब शेख, कै. जनाबाई  कदम यांच्या  कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. 

यावेळी  सभापती  शिवाजीराव  गायकवाड,  माजी  सभापती  संतोष  बोबडे,  राजकुमार  पाटील,  रामेश्वर  तोडकरी, सुजित  हंगरगेकर, डॉ.  अन्सारी,  डॉ. स्मिता  लोंढे,  राजेंद्र  डोलारे,  अप्पा गवळी आदीजण उपस्थित होते.  
 
Top