अक्कलकोट : रियाज सय्यद
भारतरत्न, गानसम्राज्ञी लतादिदी मंगेशकर यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त रविंद्र नाटय मंदीर मुंबई येथे शुक्रवार दि. 28 सप्टेंबर रोजी संपन्न होणा-या खास कार्यक्रमासाठी श्रीस्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ द्रटचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांना लतादिदी यांना विशेष निमंत्रीत केले आहे.
रविंद्र नाटय मंदीर प्रभादेवी मुंबई येथे शुक्रवार दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता भारतरत्न, गानसम्राजी, आदरणीय लतादिदी मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात लतादिदी यांच्या भगिनी मीना मंगेशकर खडीकर यांनी लतादिदीच्या जीवनचरीत्रावरील "मोठी तिची सावली’ या ग्रंथाचे प्रकाशन लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांचे शुभ हस्ते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे अध्यक्षतेखाली अणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमूख उपस्थितीत होत आहे.यानंतर लतादिदी यांनी स्वरबध्द केलेला "आनंदघन" या लोकप्रिय गितांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण होत आहे. या महत्वाच्या कार्यक्रमात मोठी तिची सावली या प्रासादिक ग्रंथाच्या १००० प्रती आदरणीय लतादिदीच्या हस्ते जन्मेजयराजे भोसले महाराजांना देण्यात येणार आहे. श्री.विट्ठल, श्री तुळजाभवानी माता व श्री .स्वामी महाराजांच्या चरणी या ग्रंथाच्या तीन प्रती ठेवण्यात येणार असून १००० ग्रंथ हे मान्यवर अतिथी यांना देण्यात येणार आहेत. या खास कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रीत केल्याचे अन्नछत्र मंडळाचे संस्था. अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले महाराज यांनी सांगितले.
या वाढदिवसाचे औचित्य साधून मा. श्री.जन्मेजयराजे भोसले यांनी आदरणीय लतादिदीच्या दिर्घआरोग्यासाठी श्री स्वामी समर्थांना लघूद्राभिषेक व तुळजाभवानी मातेस अभिषेक केला असून त्याचा प्रसाद व विभूती तसेच लतादिदी यांचे मोठे धातृचित्र याप्रसंगी ते आदरणीय लतादिदी मंगेशकर यांना देणार आहेत, असे अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रसंगी अन्नछत्र मंडळाचे सचिव श्याम मोरे, उपाध्यक्ष अभय खोबरे, जन संपर्क अधिकारी बाबासाहेब निंबाळकर आदि उपस्थित होते
