सांगली : राजेश पाटील 

आटपाडी (जि. सांगली )  येथे गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय पाटील समर्थक यल्लाप्पा  पवार आणि गोपीचंद पडळकर  समर्थकातील सोशल मीडियातील संघर्ष धुमसत होता. त्याची परिणीती आज बुधवार रोजी संघर्षात झाली. बुधवार दि. 26 सप्टेंबर रोजी  भर रस्त्यावर दोनही गटात दोन वेळा राडा झाला.

बुधवार रोजी सकाळी यल्लाप्पा पवार याला पडळकर समर्थकांनी पोलिस स्टेशन चौकात जबर मारहाण केली.यावेळी पोलिसांनी लाठीचार करून पडळकर समर्थकांना पांगवले होते. त्यानंतर अवघ्या दोन तासातच पवार समर्थकांनी पडळकर कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशन चौकातच मारहाण केली. 

यावेळीही दुसऱ्यांदा पोलिसांनी दोन्ही गटावर लाठीचार्ज करून पांगवले. या घटनेने शहरात तणावपूर्ण वातावरण बनले आहे. पोलिसांनी दोन्ही गटाच्या परस्परविरोधी तक्रारी दाखल करून घेण्याचे काम सुरू केले होते.याप्रकरणी दोन्ही गटाच्या आठ ते दहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
 
Top