उस्मानाबाद :

महिला विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  महिला समाज सेविकांना व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्रदान करण्यात येतात.

राज्यस्तरीय पुरस्कार :- महिला व बाल विकास क्षेत्रातकिमान 25 वर्षे उललेखनीय कार्य करणाऱ्या  समाजसेविकांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. रू. 1 लाख रोख, स्मृती चिन्ह शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

‍विभागीय स्तर पुरस्कार :- महिला व बालविकास क्षेत्रात किमान दहा वर्षे ‍उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांना रू.25001/- , स्मृतीचिन्ह शाल व श्रीफळ पुरस्कार दिला जातो.

जिल्हास्तरीय पुरस्कार :- महिला व बाल विकास क्षेत्रात 10 वर्षे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला समाजसेविकांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराप्रित्यर्थ रू. 10,001/- रोख , स्मृतीचिन्ह शाल व श्रीफळ देण्यात येतो.

वरील प्रमाणे सन 2015-16, 2016-17 व सन 2017-18 या वर्षाच्या पुरस्कारासाठी पात्र महिला समाजसेविका व स्वयंसेवी  संस्था यांनी विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रासह तीन प्रतीत दि. 25/9/2018 पर्यत प्रस्ताव स्वतंत्रपणे सादर करावेत तसेच‍अर्टी शर्ती व अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, खोली क्रं. 10 तळमजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधाव असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top