काटी :- तुळजापूर तालुक्यातील काटी येथे श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी दि. 6 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता ह.भ.प. कुमार केमघरणी महाराज लोणीकर यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करुन सायंकाळी 9 वाजता त्याचे किर्तन झाले. तर दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता ह. भ. प. नितीन जगताप औसेकर यांचे गुलालाचे किर्तन व महा प्रसाद झाले.
या प्रसंगी गावाचे सरपंच आदेश कोळी, उपसरपंच सुजीत हंगरेकर तसेच ग्रामपंचायत सदस्य अविनाश वाडकर, भैरीनाथ काळे, नामदेव काळे, बाळासाहेब भाले, अनिल गुंड, चंद्रकांत काटे, सहास साळुंके मा. चेअरमन सयाजी देशमुख हे उपस्थितीत होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनंजय राऊत, प्रशांत सुरवसे, तुकाराम राऊत, तानाजी राऊत, बालाजी राऊत, सुनिल मगर, बळीराम ताटे, बाळासाहेब ताटे, दत्ता राऊत, कृष्णात राऊत, मारुती राऊत, कैलास राऊत, शिवाजी ताटे, भुजंग राऊत, वसंत राऊत, अभिमान राऊत, सहास इंगळे, निखील राऊत, चैतन्य राऊत तसेच विठ्ठल भजनी मंडळ, गाटे गल्ली भजनी मंडळ यांनी परीश्रम घेतले.