काटी : तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथे शुक्रवार दि. 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयात या महिन्यात येणारे गणेशोत्सव, बैलपोळा, व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समिती सदस्यांची संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित सदस्यांना, गणेशोत्सव पदाधिकारी, ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि श्री. चौरे यांनी गावामध्ये होणारे गणेशोत्सव, बैलपोळा, व मोहरम सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले. तसेच यंदा गणेशभक्तांच्या व गणेश पदाधिकार्यांच्या सोयीसाठी पोलीस आयुक्तालयांनी ऑनलाईनद्वारे अर्जाची व्यवस्था केली असून सर्वानी गणेशोत्सवाचे ऑनलाईन परवाने काढावे व सर्व मंडळींने नियमांचे पालन करावे, व डिजेरहित गणेशोत्सव व मोहरम सण साजरे करुन पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. ऑनलाईन कसे भरायचे यांचेही मार्गदर्शन चौरे यांनी केले.
यावेळी गावातील सरपंच सौ. भामाबाई देवकर, उपसरपंच विठ्ठल गुंड, ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब गुंड, मच्छिंद्र गुंड, प्रकाश कुंभार, राम गुंड,बिट अंमलदार गाढवे, पोलीस पाटील प्रविण कुंभार, माजी पोलीस पाटील नागनाथ पाटील, आबा गुंड, धनाजी मुळे, महेश गुंड, महादेव गवळी, आकाश गुंड, सोमनाथ धोञे, संतोष आनंदकर, निलेश माळी, पंडित काळे, जोतिबा मुळे, रवि जाधव, अमित पाटील, आकाश गुंड, वैभव माळी, सतिश डांगे, सागर कुलकर्णी, कृष्णा गुंड, कृष्णा चव्हाण,तसेच गावातील सर्व मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.