तुळजापूर : कुमार नाईकवाडी

तुळजापूर  शहरातील स्वच्छता व प्लास्टिकमुक्ती याबाबत खास करून उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, शहरात काही व्यापारी व अज्ञातांकडून उघड्यावर कचरा टाकण्यात येत असल्याने अशांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय नगर परिषद तुळजापूर यांच्या वतीने घेण्यात यावा, त्यामुळे येथून पुढे कचरा टाकणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई केली जावी, यासाठी नगर परिषदेने गुप्त पथक नेमणे गरजेचे आहे. तसेच उघड्यावर कचरा टाकण्यावर तयार करण्यात येणाऱ्या गुप्त पथकामार्फत नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. 

तुळजापूर शहरात तुळजाभवानी मंदिर परिसर व प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा गोळा केला जातो. तसेच तो कचरा नळदुर्ग रोडवरील कचरा केंद्र येथे  टाकला जातो.  सध्या दिवसाला अंदाजे 12 टन एवढा निर्माण होणारा कचरा हा मोठ्या प्रमाणात एकत्रित करून तो साठवला जात आहे. अशात शहरात उघड्यावर टाकण्यात येत असलेल्या कचऱ्यावर निर्बंधही घालणे गरजेचे आहे. मात्र, त्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.  तसेच पालिकेकडून शहरातील स्वच्छतेबाबत ठोस उपाययोजना उभारण्यात याव्यात, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे. 

त्याचा विचार करत मुख्याधिका-यांनी शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घ्यावा, त्यासाठी तपासी पथक तयार केले जावे, त्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई केली जावी, तसेच गर परिषद सफाई कर्मचाऱ्यांसाठी ‘घनकचरा व्यवस्थापन’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात यावी. यामध्ये कचरा विभाजन व कचऱ्यांचे प्रकार या बरोबरच त्याचे दुष्परिणाम याविषयी माहिती दिली जावी. अशात शहरात अशाप्रकारे अज्ञातांकडून कचरा टाकल्यावर  या शिबिराचा नक्कीच उपयोग नगर परिषदेच्या  सफाई कर्मचाऱ्यांना होईल. नगर परिषद च्या कचरा  कुंड्याव्यतिरिक्त उघड्यावर कचरा टाकताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 मधील कलम 15 (zf) अंतर्गत  कारवाई करीत त्याच्याकडून नियमानुसार  दंडाची रक्कम आकारून वसुल करण्यात  यावी , अशी तरतूद या कलमामध्ये करण्यात आलेली आहे. तसेच  व्यवसाय करणाऱ्या व्यापारीना स्वतःच्या दुकानासमोर कचरा पेटी ठेवणे बंधनकारक करावे, त्याचबरोबर स्वच्छ व सुंदर तुळजापूर पालिकेकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. दररोज सकाळी व रात्री पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांकडून शहरातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता केली जात आहे. 

 प्लास्टिक तयार करताना काही रसायनांचा वापर केला जातो. प्लास्टिकमध्ये पॉलिइथेलिन, पालिव्हिनाइल क्लोराइड, पॉलिस्टेरीन, बेन्झीन, झायलीन या मुख्य रसायनांचा वापर प्लास्टिक तयार करताना केला जातो. तुळजापूर शहरात दररोज अंदाजे 12 टना पेक्षा जास्त  कचरा पालिकेकडून एकत्रित केला जातो. या कचऱ्याचे प्रमाण महिन्याला अंदाजे तीनशे साठ टन पेक्षा जास्त असते. नवरात्रीमध्ये, दिवाळी, नाताळ , उन्हाळी सुट्टी या काळात भाविकांची खुप गर्दी असते. त्यामुळे कचर्‍यामध्ये खुपच वाढ होते.  त्या कचऱ्यावरती प्रक्रिया केली जाते का ?

 शहरातून एकत्र होणाऱ्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण हे सुमारे ७५ टक्के असते. यावरून शहरात एका दिवसाला गोळा होणारा 12 टन कचरा यामध्ये प्लास्टिक किती टनामध्ये गोळा केले जात असेल याविषयी संशोधन करणे गरजेचे आहे. पालिका तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग, प्रशिक्षक आणि स्वयंसेवकांनी ‘स्वच्छ व सुंदर तुळजापूर’साठी ऑगस्ट 2017 मध्ये मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या नेतृत्वाखाली  जनजागृती केली होती 

पालिकेकडून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घ्यावा, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, याबाबतचे निवेदन राष्ट्रीय अपराध जांच ब्युरो चे उस्मानाबाद जिल्हा इन्फॉर्मेशन ऑफिसर संजयकुमार बोंदर यांनी दिले आहे.

 
Top