तुळजापूर : कुमार नाईकवाडी

सध्या शहरामध्ये मोकाट जनावरे प्रत्येक प्रमुख ठिकाणी मुक्तपणे संचार करीत असल्याने याचा शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तोंडावर भाविकांना व नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढत असून या मोकाट जनावरांचा संबधित विभागाने बंदोबस्त करावा अशी नागरीकातुन मागणी होत आहे. 

सध्या शारदीय नवरात्र महोत्सवाचे वातावरण असल्याने शहरात देवी दर्शनासाठी मदाराष्ट्रातील असंख्य भाविक तुळजापूर मध्ये दाखल होत असतात. यात मोकाट जनावरांचा नागरीकांना व भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हि मोकाट जनावरे उस्मानाबाद रोड, सोलापूर रोड, नळदुर्ग रोड, लातुर रोडवर व बसस्थानकाच्या समोर आणि अनेक रहदारीच्या प्रमुख मार्गावर ठाण मांडुन बसत आहेत. फिरत असल्याने या मार्गावर जनावरे नागरीकांच्या व भाविकांच्या अंगावर ही जात आहेत.

नगर पालिकेकडे कोंडवडा नसल्याने या जनावरांचा बंदोबस्त होत नाही. संबधित अधिकारी यांनी कोंडवडा तयार करण्यासाठी वारंवार नगर पालिकेला सुचना देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष होत आहे. न.प. ने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. 
 
Top