तुळजापुर :
येथील श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी विजयसिंग रावसाहेब (सरकार) भोसले वय वर्षे ८४ यांचे शनिवार दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर सायंकाळी पाच वाजता आपसिंगा रोडवरील स्मशान भुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
