काटी : तालुक्यातील केमवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बुधवार रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांचे पूजन मा. मुख्याध्यापक चंद्रकांत काळे यांनी केले. तदनंतर कार्यकमाचे प्रास्ताविक विद्यार्थीनी शाहीरा शेख हिने केले. गीतमंच्या चमू ने स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविकानंतर विद्यार्थांच्या वतीने चंद्रकांत काळे, बापू काळे, किशोर राऊत, श्रीकांत राक्षे, सुधीर जाधव, विठठ्ल निचळ, हरिश्चंद्र खेंदाड, वंदना आलमद, कांचन काशीद, मनिषा एखंडे, या सर्व शिक्षक बंधू, भगिनीचे शिक्षक दिनानिमित स्वागत सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकाप्रती कृतज्ञता, आदर, भक्ती व्यक्त करणारे विचार मांडले. विद्यार्थी मनोगतानंतर विठ्ठल निचळ, बापू काळे, कांचन काशीद, हरिश्चंद्र खेंदाड, यांनी आपल्या मनोगतातून शिक्षक दिनावरील मार्गदर्शनावर प्रकाश टाकला. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन कार्यक्रम यशस्वी व सुंदर साजरा केल्याने सर्वांचे अभिनंदन केले.
सुत्रसंचलन प्रियदर्शिनी नकाते या विद्यार्थिनीने तर सार्थक क्षीरसागर याने उपास्थितांचे आभार मानून शेवटी वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता केली.