अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील हुतात्मा स्मारकातील अंगणवाडी क्र. १४५ मधील टवाळखोरांच्या हैदोसातून होणाऱ्या घाणीमुळे कार्यकर्ती व मदतनीस पार वैतागल्या असून हतबल झाल्या आहेत.   

अणदूर येथील हुतात्मा स्मारकातील पोष्ट ऑफिस लगतच्या  अंगणवाडी क्र.१४५ (नवीन क्र.२) मध्ये तीन ते सहा वयातील १५ बालके आहेत. अंगणवाडी सुटली कि टवाळखोर त्याचा ताबा घेतात आणि पत्ते, दारूच्या बाटल्या, गुटख्याच्या पुड्या मनात येईल तिथे टाकून निघून जातात. गुटखा व पानाच्या पिचकाऱ्याने भिंतीही रंगल्या आहेत.लघुशंका व शौचासही या जागेचा वापर होत असल्याने दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे नाक मुठीत धरून जावे लागते. ही सर्व घाण साफ करून रोजच स्वच्छता राखणे अवघड झाले असून बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामसभेत तसेच ग्रा.पं. सदस्यांना याबाबत सांगूनही ऊपयोग होत नसल्याचे कार्यकर्ती राहीबाई सोनकवडे व मदतनीस मिनाक्षी कर्पे यांनी सांगितले. असे प्रकार सततच घडत आहेत तेंव्हा  याचा वेळीच बंदोबस्त करावा अशी रास्त मागणी होत आहे.

 
Top