अणदूर (लक्ष्मण नरे) :- तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील रविशंकर विद्यामंदिर येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी इको फ्रेंडली गणपती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
पर्यावरणाचा होणारा ऱ्हास पाहता आजच्या युगात इको फ्रेंडली गणपती स्थापना करणे व पर्यावरणाचे संतुलन राखणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी शाळा, महाविद्यालयात अशी कार्यशाळा आयोजित करणे आवश्यक असल्याचे मत मार्गदर्शिका सौ मयुरी कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
यावेळी मार्गदर्शिका कुलकर्णी यांनी मुलांना चिकण माती पासून कशा पद्धतीने गणेश मूर्ती बनवता येते याचे प्रत्येशिक करून दाखवले. इको फ्रेंडली गणपती बनविणे अत्यंत सोपे आणि आर्थिक बचत कशी होते हेही यावेळी त्यांनी मुलांना सांगितले. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा अधिक समाज जागृती व्हावी आणि प्रत्येक घरामध्ये इको फ्रेंडली गणपतीची स्थापना व्हवा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. लक्ष्मण नरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.