लोहारा (इकबाल मुल्ला) :-
लोहारा तहसीलदार श्रीमती शोभा पुजारी यांची औसा येथे बदली झाल्याने व नव्याने रुजु झालेले तहसीलदार राहुल पाटील व नायब तहसीलदार पंकज मंदाडे यांचा तहसील कार्यालयाच्या सभागृहात सत्कार कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी स्वस्त धान्य दुकानदार संघटना व तहसील कार्यालय,पत्रकार संघ,अशा विविध संघटनेच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला. तहसीलदार म्हणुन राहुल पाटील रुजु झाल्याने यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी तहसीलदार शोभा पुजारी,तहसीलदार राहुल पाटील,अदिंनी सविस्तर मार्गर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक तलाठी जगदिश लांडगे व सुत्रसंचालन तलाठी मोहन खरात यांनी केले तर आभार अव्वल कारकुन बालाजी चामे यांनी मानले.या कार्यक्रमास मंडळ अधिकारी बाळासाहेब जगताप, व्ही.आर. यादव, महेश क्षिरसागर, संतोष गवळी, माधव जाधव, संभाजी पांचाळ, भागवत गायकवाड, स्वस्त धान्य दुकान संघटना अध्यक्ष राजेंद्र कदम, पत्रकार निळकंठ कांबळे, भाजप मिडिया विभाग तालुका अध्यक्ष तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला, पत्रकार अशोक दुबे, प्रा.संत बायस यांच्यासह तहसील कर्मचारी, तलाठी व महिला, नागरीक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.