काटी : उमाजी गायकवाड 

 तुळजापूर  तालुक्यातील मंगरुळ  येथे शुक्रवार दि.( 21 ) रोजी आंतराष्ट्रीय  शांतता  दिनाचे औचित्य साधून येथील इंदिरा  माध्यमिक व उच्च माध्यमिक  विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये  प्रामुख्याने चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा,  ग्रिटींग  कार्ड तयार  करणे, शाळेच्या  आवारात वृक्षारोपण करणे आदी  कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी  शाळेच्या  आवारात शाळेचे मुख्याद्यापक एस.एस. शिंदे, पत्रकार  उमाजी गायकवाड,  स्काऊट गाईड टिचर्स, विद्यार्थी यांच्या हस्ते विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.  

 यावेळी  शाळेचे  मुख्याद्यापक एस.एस.शिंदे, मकरंद  डोंगरे, पत्रकार  उमाजी गायकवाड,  जे.बी. शेख, पी.एम.चव्हाण, बी.एन. डोंगरे, डोंबाळे  बी.पी., बी.एम. गुरव, ए. एन.बनसोडे, श्रीमती  एस.एस.  बचाटे, श्रीमती  एम.एन. उंबरे, श्रीमती आर.एम. करपे, श्रीमती व्ही.बी.जाधव, श्री.एस.के. पारधे,  श्री.  एस.एल.बासेवाड आदीसह विद्यार्थी,  विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top