नळदुर्ग :
उर्वरित परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात येऊ दे बोरी धरणासह सर्व नद्या नाले भरू दे व शेतीमालाला योग्य भाव देण्याची सद्बुद्धी दे हेच गणरायाला साकडे आहे असे प्रतिपादन दृष्टी उद्योग समाजाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते अशोक भाऊ जगदाळे यांनी वागदरी ता. तुळजापूर येथे बोलताना केले. शिव गणेश तरुण मंडळाच्या वतीने आयोजित गणपतीची आरती अशोक भाऊ जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, उपसरपंच दत्ता सुरवसे, अमोल पाटील, विजयसिंग ठाकूर, पतीसिंग ठाकूर, ज्ञानदेव यादव, नागनाथ सुरवसे, प्रमोद सोमवंशी, किशोर सुरवसे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
