सातारा : 

जिममधून चारचाकीने घरी जात असताना समोरून आलेल्या दोघांनी एकावर धारदार चाकूने हल्ला केल्याने साताऱ्यात खळबळ उडाली आहे. यात एक जखमी झाला असून तो जिहे कटापूर योजनेचे इंजिनिअर असल्याचे समोर येत आहे. शुक्रवार दि. 21 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

विनोद मुंजाप्पा (वय 34, रा. आदित्यनगरी, खेड) असे जखमीचे नाव आहे. याबाबत प्राथमिक माहिती अशी, विनोद मुंजाप्पा हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी चारचाकी कारमधून सातारा क्लबमध्ये व्यायामाला गेले होते. व्यायाम झाल्यानंतर ते कारमधून एकटेच निघाले होते. यावेळी बॉम्बे रेस्टॉरंट येथे कार आल्यानंतर त्यांना समोरून आलेल्या कारने गाडी आडवी मारून थांबवले. यावेळी संशयितांनी धारदार चाकूने मुंजाप्पा यांच्या हातावर, पाटीवर वार केले. या हल्ल्यामुळे मुंजाप्पा हे चावासाठी तेथून पळून गेले. हल्लेखोरही घटनास्थळावरून फरार झाले. शहर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, जखमीवर उपचार सुरू असून घटनेचे कारण अदयाप समोर आलेले नाही.

 
Top