![]() |
| रजाक शेख |
तुळजापूर :
तुळजापूर तालुक्यातील मौजे टेलरनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती नूतन अध्यक्षपदी रजाक शेख यांची तर उपाध्यक्ष पदी सौ.स्वाती संजय पवार यांची एकमताने निवड करण्यात आली
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शालेय समिती नुतन निवडीचा प्रस्ताव मांडून सर्वानुमाते अध्यक्ष पदी रजाक मौला शेख तर उपाध्यक्ष सौ.स्वाती पवार यांची निवड करण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गाडेकर गुरुजी व आसापुरे गुरुजी ग्रामपंचायत सदस्य अफसर सय्यद, सुधाकर क्षीरसागर पोलीस पाटील विजय वाघमारे, माजी.अध्यक्ष बळीराम वाघमारे, शरद पवार, हनीफ मुल्ला, खंडू शिरसागर अलाउद्दीन पटेल, जुबेर पटेल सह गावातील पालक वर्ग व महिला भगिनींची उपस्थिती होती निवडीनंतर नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.रजाक शेख यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
