मुंबई : शिर्डी येथील श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आज पाच कोटींचा धनादेश संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सह्याद्री अतिथीगृह येथे सुपूर्द केला.
यावेळी जलसंधारणमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार, मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.
