उस्मानाबाद : येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपीक सविता धनंजय यादव यांची मुलगी राजनंदिनी यादव हिने औरंगाबाद येथील न्यायालयात स्टेनोग्राफर परिक्षेत सुयश मिळविले आहे. त्याबद्दल पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या हस्ते राजनंदिनी व आई सविता यादव यांचा सत्कार करण्यात आला. 

औरंगाबाद येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्यावतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या स्टेनोग्राफर परिक्षेची अंतिम निवड यादी प्रसिध्द झाली आहे. यात एकूण 47 जण पात्र ठरले असून राजनंदिनी गुणानुक्रमे 12 व्या क्रमांकावर आहे. राजनंदिनी एमएससी मॅथ व स्टेनोग्राफर अशी पदवीधारक असून तिच्या निवडीबद्दल पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचारी, आई-वडिल व नातेवाईकांमधून अभिनंदन होत आहे. पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी राजनंदिनी व तिची आई सविता यादव यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 
 
Top