तुळजापूर : कुमार नाईकवाडी
तालुक्यातील शिराढोण येथील बबन सोनवणे हे भारतीय जनता पार्टीत तालुका सरचिटणीस पदावर कार्यरत असून अज्ञात तीन चोरट्यानी त्यांना चाकुचा धाक दाखवून ८१ हजाराला लुटले. हि घटना दि. २७ रोजी संध्याकाळी घडली.
पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गुरूवारी रात्री बाहेरगावाहून परतल्यानंतर ते तुळजापूर येथे उतरले. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मुलगा अभिजित याच्यासमवेत गावाकडे शिराढोणकडे दुचाकीवरून निघाले. दरम्यान, श्रीकांत कुलकर्णी यांच्या शेताजवळ सिंदफळ शिवारात अज्ञात तीन लुटारूंनी त्यांना रोखले. मुलाच्या गळ्यावर धारदार शस्त्र लावून सोनवणे यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या जवळील दोन मोबाइल फोन, बजाज कंपनीची दुचाकी व रोख ३६ हजार रूपये , तसेच पाच हजार रुपये असा एकूण ८१ हजाराचा ऐवज लुटून चोरटे अंधारात पसार झाले. जखमी सोनवणे यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत . बबन सोनवणे या फिर्यादीवरून कलम ३०७, ३९२ नुसार तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद. पुढील तपास स. पो . नि . चव्हाण करीत आहेत .
