सातारा :

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये सातारा जिल्ह्याने पहिला क्रमांक मिळवला आहे. शासनाच्या त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेमध्ये साताऱ्याने पुन्हा एकदा आपले वर्चस्व गाजवले असून यामुळे जिल्ह्याचा नावलौकिक वाढला आहे. 

याबाबतचा अहवाल राज्य आणि राज्याकडून केंद्र सरकारला प्राप्त झाल्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण मध्ये देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये साताऱ्याचा अग्र क्रमांक लागला आहे.  यामुळेच हे यश प्राप्त झाले आहे. याबाबत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

 
Top