उस्मानाबाद :- अभियांत्रिकीच्या सर्व विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षातून तृतीय वर्षात व तृतीय वर्षातून अंतिम वर्षात अनुक्रमे कॅरिऑनअंतर्गत प्रवेश द्यावा तसेच त्यांच्या लेखी व प्रात्यक्षिक तसेच टेस्ट, टर्मवर्क पूर्ण करण्यासाठी पात्र समजण्यात यावे,  अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (एनएसयुआय) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला दिला आहे. उस्मानाबाद उपकेंद्रातील संचालिका डॉ.अनार साळुंके यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. 

निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या पॅटर्ननुसार अभियांत्रिकी महाविद्यालयाची तृतीय आणि चतुर्थ वर्षाची ही शेवटची बॅच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॅरिऑन लागू न केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. परिपत्रक अभ्यासक्रम विभाग, अभियांत्रिकी, कॅरिऑन हे मागील वर्षाचे परिपत्रक काही सुधारणांसह यावर्षीही लागू करावे. कुलगुरूंनी यासंदर्भात त्वरित निर्णय घ्यावा व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. 

या निवेदनावर एनएसयुआयचे जिल्हा उपाध्यक्ष रोहित थिटे, माजी जिल्हाध्यक्ष रविशंकर पाटील, विधी विभाग जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजित शिंदे, अविनाश मुंडे, नितीन कदम, पवनकुमार चव्हाण, प्रविण पाटील, शाहिद मोमिन आदींच्या स्वाक्ष-या आहेत.


 
Top